…तर मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवली नसती : रामदास आठवले

ramdas aatahavle

तुळजापूर : पंचवीस वर्षापूर्वी राज्यात नदीजोड संकल्पना अस्तित्वात आणली असती तर राज्यात मराठवाड्यात दुष्काळी  परिस्थिती उद्भवली नसती असे सांगुन राज्यातील इरेगेशन वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीशी बोलणार असल्याची माहीती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंञी रामदास आठवले यांनी दिली ते तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे दुष्काळ पाहणी दौऱ्यात पञकारांशी बोलत होते.

यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की,मराठवाडा विर्दभात दुष्काळ परिस्थिती भयानक असुन मराठवाड्यातील इरेगेशन वाढल्या शिवाय दुष्काळ कायम स्वरुपी निर्माण होणारी दुष्काळ परिस्थिती दूर होणार नाही. सध्या राज्यात अवघे पंधरा टक्के इरेगेशन असुन आजपर्यत ते सत्तर टक्के पर्यत जाणे गरजेचे होते असं देखील ते म्हणाले.

मुंबई व कोकण किनारपट्टीवरील वाहुन जावुन समुद्रास मिळणारे पाणी जर मराठवाड्यास विदर्भास दिले गेले तर या दोन विभागात दुष्काळ निर्माण होणार नाही.लोकसभा निवडणुकीत महायुतीला ३७ जागा मिळतील असे सांगुन लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपताच प्रत्येक जिल्ह्यातील आमच्या प्रत्येकी दोन कार्यकर्त्यांची महामंडळावर नियुक्ती होईल असे त्यांनी सांगितले .