सरकारच्या फसलेल्या घोषणांच्या चिखलात यापुढे कमळ फुलणार नाही – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारच्या फसलेल्या घोषणांच्या चिखलात कमळ फुलवण्याचा प्रयत्न यापुढे यशस्वी होणार नाही, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

Loading...

सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे, जनावऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचदरम्यान धनंजय मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रात पाऊस-पाण्याचा दुष्काळ असला तरी, घोषणांचा पाऊस पाडण्यात गेल्या पाच वर्षात सरकार कुठेही कमी पडलेलं नाही, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

इतकेच नव्हे तर सरकारने अच्छे दिनापासून कर्जमाफीपर्यंत केलेल्या सर्व घोषणा फसल्या आहेत आणि फसलेल्या घोषणांचा चिखल झाला आहे. आता त्या फसलेल्या घोषणांच्या चिखलात कमळ फुलवण्याचा प्रयत्न यापुढे यशस्वी होणार नाही, असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.Loading…


Loading…

Loading...