fbpx

राज ठाकरे आधीच म्हणाले होते असं काहीतरी होईल – शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये जवळपास ३०० ते ३५० दहशतवादी मारल्याचा दावा केला जात आहे. मात्र लष्कराकडून अद्याप कोणतीही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, आता राष्ट्रावादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील सरकारने एअर स्ट्राईकमधील आकडा जाहीर करावा, अन्यथा राज ठाकरे व्यक्त करत असलेल्या शंकेत तथ्य असू शकते, असे मत पवार यांनी व्यक्त केले आहे.

आता हळू हळू चित्र पुढे येत आहे, त्यामुळे राज ठाकरे म्हणतात त्याच्यात तथ्य आहे की नाही याची शंका येत आहे. आज एकदम निष्कर्ष काढता येणार नाही. पण त्यांनी एक महिन्यापूर्वीचं असे होईल हे सांगितल्याच देखील पवार म्हणाले.

दरम्यान, पुलवामामध्ये हल्ला घडवणारे बाहेरच्या देशातून आले नव्हते. आपल्याच व्हॅलीमध्ये संताप वाढत आहे. तो कमी करण्यासाठी काय करता येईल, हे शोधन गरजेचं असल्याच मत देखील शरद पवार यांनी व्यक्त केले.

1 Comment

Click here to post a comment