‘सध्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाही’, काँग्रेसचे स्पष्टीकरण

nana patole

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत मिळत आहेत. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापित झाले. त्यानंतर काही कोरोनाने महाराष्ट्रात हाहा:कार माजला होता. त्यातच सचिन वाझे प्रकरण, १०० कोटी वसुली प्रकरण, संजय राठोड राजीनामा, अनिल देशमुख राजीनामा अशी प्रकरणं खूपच चर्चेत राहिली. आता विधानसभा अध्यक्षासाठी विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत हे सरकार आहे. असतानाच मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येण्याची चिन्हे आहेत.

राज्यात फेरबदलाचे संकेत मिळत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीत आहेत. त्यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले होते. मात्र, राहुल गांधींना भेटल्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदलावर पटोले यांनी भाष्य केले आहे. राज्यात काँग्रेसच्या काही मंत्र्यांना वगळण्यात येण्याच्या चर्चांचे त्यांनी खंडण केले आहे.

ते म्हणाले, ‘मंत्र्यांना डच्चू देण्यात येण्याच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. सध्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाही. तशी काही चर्चा महाविकास आघाडीत चर्चा झाली नाही. पुढच्या काळात फेरबदल होणार की नाही याचा निर्णय हायकमांड घेईल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काँग्रेस काही अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते. दोन मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल पक्षामध्ये नाराजीचा सूर आहे अशी चर्चा आहे. त्यात आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या जागी दोन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता होती. परंतू पटोले यांच्या स्पष्टीकरणामुळे अनेकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP