महाराष्ट्रात काही गमावून युती होणार नाही,सर्व जागांसाठी तयार रहा-शहा

दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्रातील खासदारांची दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहांसोबत भेट झाली. या बैठकीत युतीसंदर्भात अमित शहांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. युती करायची तर काही गमावून का करायची असा प्रश्न उपस्थित केला. काही गमावून अजिबात युती होणार नाही अशी स्पष्ट भूमिकाच यावेळी त्यांनी बोलून दाखवली. यावेळी त्यांनी खासदारांना सर्वच जागांवर तयार रहा,युतीच नंतर बघू असे आदेशच दिले आहेत.

महाराष्ट्रात सदनात झालेल्या या बैठकीत भाजपचे सर्वच खासदार उपस्थित होते.या बैठकीला स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेही उपस्थित होते. बैठकीत महाराष्ट्रातील सर्व खासदारांचा लोकसभेमधील आणि लोकसभा क्षेत्रातील आढावा घेतला. खासदारांनी आपल्या मतदारसंघातील कामगिरीविषयी माहिती दिली, सोबतच मतदारसंघातील अडचणींबाबत सूचनाही केल्या.या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.

You might also like
Comments
Loading...