…तर आंदोलनावर आमचं नियंत्रण राहणार नाही-प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा: सकाळी ११ वाजता आमच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. जे भीमा कोरेगाव घटनेला जबाबदार आहेत त्यांना अटक करण्याचे त्यांनी मान्य केले आहे अस प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केल आहे.

त्याचबरोबर कोंबिंग ऑपरेशन थांबवण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन सुद्धा दिल्याच आंबेडकर यांनी सांगितल. तर सरकारने संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेला अटक करून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता नाही केली तर आंदोलनावर आमच नियंत्रण राहणार नाही असा सरळ इशारा सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

Loading...

– दलित तरुणांची धरपकड तात्काळ थांबवावी : प्रकाश आंबेडकर

– अजूनही संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेला अटक का करण्यात आलेली नाही? : प्रकाश आंबेडकर

– सरकारनं दिलेल्या आश्वासनांची लवकर पूर्तता करावी : प्रकाश आंबेडकर

– मुख्यमंत्र्यांनी कारवाई करुन लोकांना विश्वास द्यावा : प्रकाश आंबेडकर

– आमच्या मागण्या शासनाकडून मान्य : प्रकाश आंबेडकर

– कोंबिंग ऑपरेशन थांबवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन : प्रकाश आंबेडकर