भिडेंनी एखादा आंबा सरकारला द्यावा, म्हणजे वर्षभरात विकास पैदा होईल

टीम महाराष्ट्र देशा- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये आंब्यासंदर्भात केलेल्या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारला ४ वर्ष झाली परंतु नुसत्या पोकळ घोषणा दिल्याजात आहेत. विकास कुठे होताना दिसत नाही. त्यामुळे भिडे गुरुजींनी त्यांच्या बागेतला एखादा आंबा सरकारला द्यावा, म्हणजे वर्षभरात विकास पैदा झाल्यासारखे होईल, अशी टीका तटकरे यांनी केली आहे.

माझ्या शेतातील आंबा खालेल्या जोडप्यांना मुले होतात, असा दावा संभाजी भिडे यांनी केला होता. त्यांच्या या विधानामुळे भिडे सध्या टीकेचे धनी बनले आहेत.कोकण पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या सुनील तटकरे यांनीही संभाजी भिडे यांना यावरून लक्ष्य करत सरकारवर निशाणा साधला.