fbpx

कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसणार,’या’ नेत्याने घेतली उद्धव ठाकरेंची भेट

उद्धव ठाकरे

मुंबई : काँग्रसमधून दिवसेंदिवस अनेक नेते सेना-भाजपमध्ये जात आहेत. सुजय विखे यांच्यासह अनेक दिग्गज नेते युतीची वाट धरत असताना आता तिकीट नाकारल्याने नाराज झालेले काँग्रेस नेते विश्वनाथ पाटील हे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेसने भिवंडीतून सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे.या पार्श्वभूमीवर विश्वनाथ पाटील यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून निवडणुकीच्या तोंडावर पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

विश्वनाथ पाटील हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य होते. काही दिवसांपूर्वीच विश्वानाथ पाटील यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे ते लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतही होते.