युपीत रंगणार योगी विरुद्ध प्रियांका असा सामना; कॉंग्रेसपुढे असणार आव्हानांचा डोंगर

yogi vs priyanka

लखनौ – उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लढत देण्यासाठी पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांना पक्षाचा चेहरा बनविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे नेते अखिलेश प्रताप सिंह यांनी याला दुजोरा दिला आहे.

मागील काही दिवसांपासून प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशात सक्रिय आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्यातील भाजप सरकारवर त्या सातत्याने हल्लाबोल करीत आहेत. राज्यातील पक्ष संघटनेतही त्यांनी आधीपासूनच लक्ष देण्यास सुरवात केली होती.

दरम्यान,कोणत्याही परिस्थितीमध्ये युपीची सत्ता टिकवणे हेच भाजपचे ध्येय असून यासाठी जोरदार मोर्चेबांधणी देखील सुरु झाली आहे. मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मोठे यश मिळविण्याचा चंग भाजपने बांधला आहे.

योगी सरकारवर नाराज असलेल्या ब्राह्मण मतदारांना एकत्र आणण्यासाठी प्रियांका गांधी वरिष्ठ नेते प्रमोद तिवारी, राजेश त्रिपाठी आणि आचार्य प्रमोद कृष्णन या ब्राह्मण समाजातील नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. जितीन प्रसाद यांच्या जाण्यामुळे कॉंग्रेसचे मोठे नुकसान झाले असून हे भरून काढणे कॉंग्रेसला शक्य होईल की नाही याबाबत देखील शंका उपस्थित केली जात आहे.

पक्षातील नेत्यांना पक्षातच ठेवणे हे देखील एक मोठे आव्हान कॉंग्रेसपुढे असणार आहे. भाजप हिंदुत्व व आणि राममंदिर कार्यक्रमावर ही निवडणूक लढणार हे स्पष्ट असल्याने कॉंग्रेस देखील हिंदू धर्मियांच्या भावना लक्षात घेत पावले टाकावी लागणार आहेत. दलित,ठाकूर,आदिवासी आणि अल्पसंख्याक  यांच्या मतांना आपल्या झोळीत पडून घेणे हा देखील एक मोठा टास्क असणार आहे.

एका बाजूला हे सर्व घडत असताना दुसऱ्या बाजूला यूपीतील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि बसपा सोबत आघाडी करणार नाही, असं समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने फक्त ७ जागा जिंकल्या होत्या. तर समाजवादी पार्टीला ४७ जागा मिळाल्या होत्या.त्यामुळे नाविलाजाने कॉंग्रेसला उत्तर प्रदेशात स्वबळाची तयारी करावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP