विधानसभेला युती होणारच पण मुख्यमंत्री भाजपचाच होणार – अमित शहा

blank

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात शिवसेनेसोबत विधानसभेला युती ही राहणारच. ज्याप्रमाणे लोकसभेला मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी काम केलं. तसंच विधानसभेला युती तर होणार मात्र मुख्यमंत्री भाजपचा असेल अस आज दिल्लीती झालेल्या भाजपच्या मंथन बैठकीत अमित शहा यांनी स्पष्ट केल आहे. केवळ आपल्याच जागांवर नव्हे तर मित्रपक्षाच्याही जागा निवडून आणण्यासाठी तितकीच मेहनत करा अशा सुचना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्ली येथे झालेल्या भाजपच्या मंथन बैठकीत भाजप नेत्यांना दिल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. भाजपमध्ये आता निवडणुकांची खलबतं सुरू झाली आहेत. दिल्लीमध्ये भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक झाली. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार झाली. या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील भाजपचे जवळपास सर्वच मंत्री दिल्लीत या बैठकीला उपस्थित होते.