कुठे गेले ‘राणेंचे’ ते कार्यकर्ते
प्रमोद आणि निलेश का दुरावले

औरंगाबाद- अभय निकाळजे ( वरिष्ठ पत्रकार ) – माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे काँग्रेसमध्ये असतांना त्याच्या तत्कालीन ‘स्वाभिमानी’ जी अस्तित्वात होती. तेव्हाचे निष्ठावान राणेंसोबत रविवारी ( दि. 11) औरंगाबादेत झालेल्या जाहीर सभेत दिसले नाहीत. राणेंचे कट्टर समर्थक प्रमोद राठोड काँग्रेसमध्ये असतांना होते. त्यांनी राणेंचा ‘प्रहार’ औरंगाबादेत सुरू करायचा म्हणून शेंद्रा एमआयडीसीमध्ये जागाही घेतली. तर आकाशवाणी चौकात एक व्यवसायिक जागाही विकत घेऊन ठेवली आहे. त्याचा आत्ताही सगळा व्यवहार प्रमोद राठोडच पहातात. पण राणेंच्या सोबत राजकीय सर्मथक होण्याचे राठोड यांनी टाळले. तश्याच पद्धतीने युवा नेते निलेश शिंदेंनीही राणेंची राजकीय साथ देण्याचे टाळले. निलेश शिंदेकडे तसा शिवसेनेचा राजकीय वारसा आई कडून मिळालेले असतानांही त्यांनी राणेंचे चिरंजीव निलेश आणि नितेशची साथ दिली. त्यांच्या प्रचारासाठी सिंधूदुर्गमध्ये वाडी-वाडी पालथी घातली होती. पण सत्तेत असतांनाचा राणे कुटुंबियांचा रूबाबाने आणि लहरीपणाने निलेश शिंदेंनी आपला ‘स्वाभिमानी’ बाणा म्यान केला.
फक्त सुदाम सोनवणे निष्ठावान
सुदाम सोनवणे हे काँग्रेसमध्ये येण्याच्या आधीपासून म्हणजे शिवसेनेत असल्यापासून राणेंचे कट्टर समर्थक आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे कार्यकर्ते चेतन कांबळे यांनी जेव्हा राणेंच्याविरोधात औरंगाबादच्या छावणी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार केली होती. तेव्हा एकटे सुदाममामा सोनवणे तिथे होते. किशोर कच्छवाह यांच्याशी सुदाममामांशी मारहाणही केली होती. राणेंनी सुदाममामा सोनवणेंना राजकीय साथीदिल्याबद्दलचे ‘लाभ’ही दिले. त्यामुळेच सुदाममामांशिवाय इतर कुणीही रविवारच्या राणेंच्या सभेच्या व्यासपीठावर नव्हते.