कर्णधार विराट कोहली विरोधात राजकारण होतयं; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा दावा

virat

मुंबई : आगामी T20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघात मोठे फेरबदल होण्याची चर्चा सुरु होती. कर्णधार विराट कोहली कर्णधार पदावरून पायउतार होणार असल्याच्या जोरादार चर्चा रंगल्या होत्या. तसेच कोहलीच्या जागी मुंबईकर रोहित शर्मा भारताचा एकदिवसीय आणि T20 चा कर्णधार होणार असल्याचं देखील बोललं जात होत.

याच चर्चांवर बीसीसीआयने स्पष्टीकरण दिलं आहे. BCCI चे सचिव जय शाह यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, ‘सध्या संघ जी कामगिरी करत आहे, ती चांगली होत ​​आहे. त्यामुळे कर्णधारपद बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’. जय शहा यांनी कोहलीच्या कर्णधार पदावर होणाऱ्या अफवांवर पूर्णविराम लावला आहे. तसेच विराटच्या इच्छेनुसार तो कर्णधारपदाचा निर्णय़ घेऊ शकतो. हे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये मात्र त्यांचा माजी क्रिकेट कर्णधार सलमान बटने विराट कोहलीविरोधात घाणेरडा राजकारण खेळलं जात असल्याचा आरोप केला आहे. भारताचा न्यूझीलंडकडून इंग्लंडमधील जागतिक कसोटी अजिंक्य पद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात पराभव झाल्यापासून विराटच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. याच मुद्द्यावरून पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलमान बट्टने कोहलीच्या बाबतीत राजकारण खेळलं जात असल्याचा दावा केला. तसंच इंग्लंड दौऱ्यात विराटचे काही निर्णय़ बीसीसीआयला पटले नसल्याने ते त्याच्यावर नाराज असल्याचंही बटने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या