फुसका बार : सोनियांशी सत्ता स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही – शरद पवार

blank

टीम महाराष्ट्र देशा : ‘सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.” असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. महाराष्ट्रातील सरकारवरील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सायंकाळी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. दोन्ही पक्षांच्या प्रमुखांमधील बैठक सुमारे पन्नास मिनिटे चालली.

सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सोनिया गांधीसोबत फक्त आघाडी बाबत चर्चा झाली. सध्या शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच राज्यातील महाशिव आघाडीबाबत कोणताही ठोस निर्णयही घेण्यात आला नाही. आता राज्यातील दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर नजर ठेवली जाणार आहे. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून पुढे काय करायचे हे ठरविले जाईल.

त्यानंतर ते म्हणाले की, एकसुत्री कार्यक्रमासाठी समन्वय समितीची कोणतीही बैठक झाली नाही. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस एकत्र निवडणूक लढले आहेत. त्यामुळे आघाडीतील मित्र पक्षांना विश्वासात घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील महाशिव आघाडीबाबत सस्पेन्स अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेचा पेचही कायम राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :