कर्नाटक मधील प्रकार जाणिवेतून कुठलाही राजकीय हेतू नव्हता; चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा: ‘हुट्टीदरे कन्नड नाडू हुट्टू बेकू’ (जन्माला यायचे तर कर्नाटकातच जन्म घ्यावा) असे म्हणत चंद्रकांत दादांनी हे कर्नाटकचे गोडवे गायले होते याला सर्व राजकीय स्तरातून विरोध झाला होता. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील तवग गावातील दुर्गादेवी मंदिराच्या उद्घाटनाला हजेरी लावली. तेव्हा चंद्रकांत दादांनी हे कर्नाटकचे गोडवे गायले होते. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी चंद्रकांत दादांनी मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला असे विधान केले होते. त्यामुळे आज चंद्रकांत पाटील यांनी हा सर्व प्रकार जाणिवेतून घडल्याचे स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील

बेळगावमधल्या गोकाकच्या तवग गावातील दुर्गादेवी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावेळी घडलेला प्रकार सहज जाणिवेतून घडलेला प्रकार आहे. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता. यल्लाप्पा म्हणून माझ्या घरातीलच एक कुटुंबातील कार्यकर्ता गोकाक तालुक्यातील तवग येथे राहतो. त्याने गावात सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली. या सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले होते. या कार्यक्रमाच्या सोहळ्यासाठी तिथे गेलो होतो.

तेथील वातावरण पाहून तसेच गावकऱ्यांनी  कन्नड भाषेतून संवाद आणि गाणे म्हणण्याची विनंती केली. त्यानुसार मी त्या ठिकाणी दुर्गा देवीवर सुमारे दोन मिनिटं कन्नड भाषेतून संवाद साधला आणि गाण्याच्या दोन ओळी गायल्या. तसेच ग्रामविकास या विषयावर सुमारे वीस मिनिटं मी हिंदी भाषेतून भाषण केले. तेथील वातावरणानुसार घडलेला हा एक सहज प्रकार आहे. यामागे अन्य कुठलाही राजकीय हेतू नाही.

You might also like
Comments
Loading...