छोटया पडद्यावरील ‘मन झालं ..’ मालिकेत आले ट्विस्ट

raya

मुंबई : टीव्हीवरील मराठी मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत असतो. अल्पावधीतच लोकप्रियता मिळविणारी ‘मन झालं बाजींद’  मालिकेतील  कृष्णा आणि राया या प्रमुख व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मात्र या मालिकेत राया आणि कृष्णा यांच्या लग्नाची लगबगीने चांगलेच लक्ष वेधत आहे.

या मालिकेतील राया आणि कृष्णा एकमेकांना आपल्या आयुष्यभराच्या जोडीदाराच्या रूपात बघत नाही . मात्र रायाच्या पत्रिकेत दोष असल्यामुळे त्याची पहिली बायको ही अल्पायुषी असेल असं भाकीत गुरुजींनी केलं आहे. यामुळे मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की गुली मावशी राया आणि कृष्णाचं लग्न लावण्यासाठी मामावर दबाव आणतेय. मामाला गुरुजींच्या भाकिताबद्दल कळलं आहे.

दरम्यान, गुली मावशीमुळे त्याचे प्रयत्न फसतात. कृष्णाला वचनात बांधून टाकते. गुली मावशीच्या षडयंत्रानुसार अंतरा लग्नाच्या मांडवातून गायब झाल्याने भाऊसाहेबांचा अपमान होताना पाहून कृष्णा रायाशी लग्न करण्यासाठी तयार होते. राया आणि कृष्णा हे दोघं पण या लग्नामुळे खुश आहेत का? ते दोघं एकमेकांचा पती पत्नी म्हणून स्वीकार करतील का? अशा अनेक प्रश्न प्रेक्षकांना देखील पडले आहे. एकंदरीत या मालिकेतील कथानकात आता ट्वीस्ट आल्याने अधिकच रंजक होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या