सांगलीची जागा स्वभिमानीला सोडल्याने कॉंग्रेस कार्यकर्ते नाराज,कमिटी कार्यालयाला टाळे ठोकले

सांगली – लोकसभेची जागा स्वाभिमानीला दिल्यानंतर सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाल्याचं चित्र पहायला मिळाले . पक्षाच्या या निर्णयाचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज कमिटी कार्यालयाला टाळे ठोकले.

बऱ्याच  दिवसांपासून कोणाचे नाव अंतिम होत नसल्याने गुरुवारी अचानक सांगलीची जागा खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला सोडली जात असल्याचे वृत्त आले. वक्ते इंद्रजित देशमुख हे उमेदवार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.ही बातमी कळताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. कोणत्याही परिस्थितीत ही जागा कोणालाही देऊ नये. अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

दरम्यान, आ. डॉ. विश्वजित कदम आणि युवानेते विशाल पाटील यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. कार्यकर्ते, पदाधिकार्यांतही वादावादी झाली. अखेर काँग्रेस कमिटीला कुलूप घालण्यापर्यंत वादाचे पर्यवसान झाले.