fbpx

ठेवीदारांना फसवण्याचा डीएसकेंच प्लॅन होता; पोलिसांनी मांडली न्यायालयात बाजू

डीएसके

पुणे: बांधकाम व्यावसायिक डी.एस कुलकर्णी यांचा ठेवीदारांना फसवण्याचा प्लॅन होता, तसेच त्यांची बँक खाती सील करायची असल्याने त्यांना जमीन दिला जाऊ नये अशी बाजू आज पोलिसांकडून न्यायालयासमोर मांडण्यात आली आहे. ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डी.एस कुलकर्णी यांची रवानगी सध्या येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

दरम्यान, डीएसके यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. पोलिसांकडून या प्रकरणी आज लिखित स्वरूपात आपली बाजू मांडण्यात आली.

डीएसके यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर कोर्टाने लेखी स्वरूपात पोलिसांना त्यांची बाजू मांडायला सांगितले होते, यावर बाजु मांडताना डीएसकेंची अजून चौकशी सुरू आहे, त्यांची बँक खाती सील करायची आहेत.

ठेवीदारांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याने आरोपी पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच त्यांना जामीन मंजूर झाला तर समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे त्यांना जमीन दिला जाऊ नये अशी बाजू पोलिसांकडून लेखी स्वरूपात कोर्टासमोर मांडण्यात आली आहे. दरम्यान, 17 मार्च रोजी पुढील सुनावणी घेतली जाणार आहे.