#HyderabadEncounterअशाप्रकारचे अपराधी हे कलंक असतात, यांच्यावर अशीच कारवाई झाली पाहिजे : बाबा रामदेव

टीम महाराष्ट्र देशा : हैद्राबादमधील झालेल्या प्रकरणावर आता सर्वच स्तरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहे. “बलात्कारी आणि दहशतवाद्यांवर अशाच प्रकारची कारवाई झाली पाहिजे. अशाप्रकारचे अपराधी हे कलंक असतात. अशा लोकांमुळे संपूर्ण देश आणि धर्म, संस्कृती बदनाम होत असते. जे दुष्कृत्य करतात त्यांच्यासोबत आणि दशतवाद्यांविरोधात त्याच ठिकाणी पोलिसांना, सैन्याला आणि निमलष्करी दलाला अशीच कारवाई करायला हवी”. अशी योगगुरू बाबा रामदेव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

“ज्या घटनांबाबत साशंकता असेल त्याबाबतच न्यायालयात जायला हवे. त्यावेळीच कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब केला पाहिजे”. असे ते म्हणाले. तेलंगणा पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे समाजातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. सामान्य नागरिक म्हणून हैद्राबाद पोलिसांनी केलेली कारवाई ही योग्य आहे.

हैद्राबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा खात्मा झाला आहे. तेलंगणा पोलिसांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या याचारही आरोपींचा जागीच एन्काऊंटर केला आहे. पोलिस चौघांनाही ज्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आलं, त्या घटनास्थळी घेऊन गेले होते. मात्र तिथे या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी या चारही आरोपींना जागीच संपवलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या