मुंबई : ५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांची पंजाबमधील फिरोजपूर येथील सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर आंदोलकांमुळे सुमारे १५ ते २० मिनिटे अडकून पडला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींच्या सुरेक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये, तसेच या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी केल्याचे सांगितले आहे.
ट्विटमध्ये राऊत म्हणाले आहेत की,’पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्या सुरेक्षे बाबत कोणतीच तडजोड होता कामा नये. पंजाब दौऱ्यात नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत. याच त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे, असे राऊत म्हणाले आहेत.
पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्या सुरेक्षे बाबत कोणतीच तडजोड होता कामा नये.पंजाब दौऱ्यात मोदी यांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत. याच त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हावी
अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.— Sanjay Raut (@rautsanjay61) January 6, 2022
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या त्रुटीनंतर कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्यासोबत चर्चा केली असून पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहे. त्यांच्या सुरक्षतेची पूर्ण काळजी घेणे गरजेचे होती. पंतप्रधानांना पूर्ण सुरक्षाव्यवस्था पुरवणे गरजेचे आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे, ‘असे सोनिया यांनी मुख्यमंत्री चन्नी यांना सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘कोरोना, भीती आणि धास्ती असे भूत जगाच्या मानगुटीवर बसलेत’
- ‘मोदी ड्रामा बंद करो’; नाना पटोलेंचा पंतप्रधानांवर निशाणा
- वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा; पाकिस्तानशी होणार पुन्हा सामना!
- अभिनेत्री मेहक चहलला मिळत नाही ‘वर’ म्हणाली, “मी अरेंज मॅरेजसाठी…”
- ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<