कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ असावे; प्रवीण दरेकरांची मागणी

parvin darekar

मुंबई : भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळाच्या मुद्यावरून आरोप-प्रत्योरापांच्या फैरी झडताना दिसत आहेत. या महामंडळांच्या मुद्यावरून राजकारण तापले असताना प्रवीण दरेकर यांनी कोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी केली आहे.

कोकणाला संपूर्ण महाराष्ट्र विकास महामंडळातून वगळून कोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी करत कोकणाने आतापर्यंत भरभरून दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणाचे आहेत. शिवसेनेलाही कोकणाने खूप दिले आहे. आता कोकणाची परतफेड करण्याची वेळ आली आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

कोकणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा. कोकणाला काही मिळाले नाही, तर ठाकरे सरकारचे कोकणासाठी हे पुतना मावशीचे प्रेम म्हणावे लागेल, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी यावेळी बोलताना केली. शिवसेना आता फक्त मुंबई आणि कोकणपुरतीच आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाच्या अखत्यारीत पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि कोकण असे तीन विभाग येतात. या मंडळाचा जास्तीत जास्त निधी पश्चिम महाराष्ट्राच्या वाटय़ाला जात असल्याने कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे; पण अद्याप त्यावर काहीच निर्णय घेतलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या :