मुंबई : ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. १८ मार्चला होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून त्याच्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षा असताना, बहिष्काराच्या मागणीने दणका दिला आहे. ट्विटरवर #BoycottBachchhanPaandey हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. खरं तर, हा चित्रपट हिंदू आणि पंडितांचा अपमान करतो, असे एका विशिष्ट वर्गाचे म्हणणे आहे. त्यांना पडद्यावर चुकीचे आणि नकारात्मक दाखवत आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊ.
अक्षय कुमार, क्रिती सेनन आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा ‘बच्चन पांडे’ चित्रपट लोकांचा विरोध होताना दिसत आहे कारण, त्याचे शीर्षक आणि मुख्य पात्र आहे. सोशल मीडियावर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत लोक लिहित आहेत की, बॉलिवूड चित्रपट निर्माते जाणूनबुजून पडद्यावर हिंदू आणि ब्राह्मणांच्या नकारात्मक प्रतिमा दाखवत आहेत. चित्रपटातील मुख्य पात्राचे नाव ‘बच्चन पांडे’ म्हणजेच पंडित असून, तो खलनायकाच्या भूमिकेत आहे. केवळ चित्रपटावरच नव्हे, तर संपूर्ण बॉलिवूडवर बहिष्कार घालायला हवा, असे विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे. इतकंच नाही, तर या चित्रपटाची टॅगलाइनही ‘होली पर गोली’ आहे.
बॉक्स ऑफिसवर काश्मिरी पंडितांना पाहून प्रेक्षकांच्या हृदयात खोलवर वेदना निर्माण झाल्या आहेत. काही लोक असेही म्हणतात की, फरहाद सामजी या मुस्लिम दिग्दर्शकाने मुद्दाम हिंदू नायक अक्षय कुमारची चित्रपटात नकारात्मक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी निवड केली होती. काही लोक या चित्रपटाची तुलना ‘द काश्मीर फाइल्स’शी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<