‘डाल मे जरुर कुछ काला है!’ डेव्हिड वार्नरच्या वादात डेल स्टेनची उडी

दिल्ली : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबाद संघाचा ५५ धावांनी पराभव केला. राजस्थानने दिलेल्या २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ केवळ १६५ धावापर्यंत मजल मारु शकला. धडाकेबाज शतकासाठी राजस्थाचा सलामीवीर जोस बटलरला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

हा सामना सुरु होण्याच्या एक दिवस आधि हैदराबाद संघाने डेव्हिड वॉर्नरची कर्णधारपदावरुन उचलबांगडी केली तर या सामन्यात वॉर्नरला अंतिम ११ मध्ये स्थानही नाही दिले. यावर वॉर्नरच्या अनेक चाहत्यानी नाराजी व्यक्त केली. यात आता दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने या वादात उडी घेतली आहे. स्टेन म्हणाला की, ‘वॉर्नर हा अंतिम ११ मध्ये नव्हता हे पाहून धक्काच बसला. नक्की माहिती नाही माझ्या अंदाजानुसार वॉर्नरच्या काही निर्णयांमुळे त्याच्या नेतृत्त्व शैलीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले असतील. किंवा संघ व्यवस्थापनाला आगामी स्पर्धेत केन विलियम्सनला कर्णधार बनवायचे असेल, त्यामुळे यावर्षीच त्याची कर्णधारपदी नियुक्ती केली असावी.’ असे स्टेन म्हणाला

पुढे बोलताना स्टेन म्हणाला की,’ वॉर्नरची प्रतिभा अद्भुत आहे. मी असतो तर प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिली असती. वॉर्नरला हैदराबादकडून खेळताना पाहण्याची ही शेवटची वेळ असेल. अशी शंकाही स्टेनने व्यक्त केली. तसेच बंद दाराआड हैदराबादच्या संघात काहीतरी घडत आहे, ज्याची कल्पना आपल्यापैकी कोणालाही नाही,’ असे स्टेन म्हणाला. डेल स्टेन हा २०१५ आयपीएल स्पर्धेत वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळला आहे.

महत्वाच्या बातम्या