‘बॉलिवूडमध्ये एवढी शत्रूता आहे की, अक्षय कुमार सारखे मोठे कलाकार देखील करतात लपून फोन’

अक्षय कुमार

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत कोणालाही लक्ष्य करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. कंगना नेत्यांपासून ते बॉलिवूड सेलेब्रिटीपर्यंत सर्वांनाच वेठीस धरते. कंगना सध्या चालू घडामोडींवर आपलं स्पष्ट मत मांडताना दिसते. यावेळीही कंगनाने ट्विट करून धक्कादायक खुलासा केला आहे.

कंगनाने जे ट्विट केले त्या ट्विटमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. कंगनाने मुव्ही माफियांवर निशाणा साधत हे ट्विट केलं आहे. अक्षय कुमार सारखे मोठे कलाकार मला सिक्रेटली फोन करत असल्याचा खुलासा कंगनाने या ट्विटमध्ये केला आहे.

कंगना ट्विट करत म्हणाली,’बॉलिवूडमध्ये एवढी शत्रूता आहे की लोकांना कौतुक करण्यासही अडथळा निर्माण करतात. मला अनेक सिक्रेट कॉल आणि मॅसेज आले होते. अक्षय कुमार सारखे अनेक मोठे कलाकार मला फोन करायचे. थलायवा सिनेमाचं सगळीकडून कौतुक झालं मात्र आलिया आणि दीपिकाच्या सिनेमांप्रमाणे या सिनेमाचं मोकळेपणाने कौतुक झालं नाही.’

या ट्विट नंतर कंगनाने आणखी एक ट्विट केलं,त्या ट्विट मध्ये कंगना म्हणाली, ‘जर कलेशी जोडलेली इंडस्ट्री ऑब्जेक्टिव राहू शकली असती आणि पावर आणि राजकारणात फक्त सिनेमासाठी सहभागी झाली असती. माझं राजकीय मत आणि आध्यात्माची मत बुली करून मला टार्गेट केलं जातं. पण असं झालं तर मीच जिंकते’

महत्वाच्या बातम्या