मोहम्मद अली जीना यांचे छायाचित्र असण्यात काहीच गैर नाही-हमीद अन्सारी

blank

टीम महाराष्ट्र देशा : अलीगढ मुस्लीम विद्यापीठात मोहम्मद अली जीना यांचे छायाचित्र असण्यात काही गैर वा चुकीचे नाही कारण कोलकत्यात जर व्हिक्टोरिया स्मारक आहे. तर मुस्लीम विद्यापीठात अली यांचे छायाचित्र का नाकारावे. असे मत भारताचे माझी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं.

विविधतेने नटलेल्या भारतात सध्या अल्पसंख्याकांमध्ये अस्वस्थता वाढत चालली आहे. धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये असलेल्या अस्वस्थेकडे लक्ष्य दिले पहिजे. भारतात अश्या काही घटना घडल्या आहेत. ज्यावरून देशातच नव्हे तर देशाबाहेरून ही यावर प्रतिक्रिया आल्या आहेत हे नाकारून चालनार नाही. धर्मावरून त्यांची ओळख व्यक्त होत असल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी ते म्हणाले की मी या देशात वाढलो आहे या देशाची मी ४० वर्ष सेवा केली. परंतु माझी या देशात धर्मावरून ओळख निर्माण करून दिली जात आहे. त्यामुळे माझ्या मनातला धर्म निरपेक्ष भारत राहिलेला नाही.

राज्यसभेचे सभापती या नात्याने शेवटच्या दिवशी सर्व सदस्यांनी अन्सारी यांचे आभार मानले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी त्यांचा उल्लेख मुस्लीम देशात अल्पसंख्याकांसाठी काम केलेले मुत्सदी नेते असा केला त्यावर ते म्हणाले कि मी यामुळे नाराज झालेलो नाही. परंतु अश्या प्रकारे धर्माच्या आधारे माझ्याबद्दल जी प्रतिक्रिया व्यक्त होतेय यामुळे मला काळजी वाटते.

लिंगायतांंना धर्म मान्यता न दिल्यास पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात भाजपला फटका – आंबेडकर 

राज्यसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक; भाजपकडून नरेश गुजराल याचं नाव आघाडीवर