fbpx

संघाकडून शिकण्यासारखे काहीही नाही, अशोक चव्हाणांचा पवारांवर निशाणा

ashok chawan

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यात आघाडीचे नेते गुंतले आहेत, अनेकांकडून पक्ष संघटनेत आलेल्या मरगळीमुळे शेवटच्या घटका प्रयत्न पोहचू शकलो नसल्याची भावना आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी संघाचे विचार पटत नसले तरीही त्यांच्या चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करायला हव्यात, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता. पवार यांच्या विधानावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निशाणा साधला आहे.

कॉंग्रेस पक्ष आजवर संघाशी कायम संघर्ष करत आलेला आहेत, त्यामुळे त्यांचे अनुकरण करण्याची गरज नाही. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून घेण्यासारखे काहीही नाही, असा टोला चव्हाण यांनी लगावला आहे.

नेमक काय म्हणाले होते शरद पवार

आपल्याला संघाचे विचार पटत नसले तरी त्यांच्या काही चांगल्या गोष्ठी आत्मसात करण्यास काही हरकत नाही. संघाचे स्वयंसेवक सकाळी एखाद्याच्या घरी गेले आणि घर बंद असेल तर पुन्हा संध्याकाळी जातात. तेव्हासुद्धा जर संबंधित व्यक्ती भेटली नाही तर ते दुसऱ्या दिवशी जातात. पण संबंधित व्यक्तीला भेटतातच. असं वक्तव्य शरद पवार यांनी केले होते.