fbpx

‘इंदुसरकार’ला विरोध करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनीच केला चित्रपट ‘हाउसफुल’

There is nothing objectionable about Indiraji in the Indu Governmen

दीपक पाठक – इंदू सरकार या चित्रपटावरून मागील काही दिवस बरेच वाद सुरू होते. आज हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. फस्ट डे फस्ट शो हा चित्रपट पाहण्यासाठी सामान्य नागरिक जातील अशी आशा होती मात्र काँग्रेसजनांनीच या चित्रपट पाहायला गर्दी केल्याचे समोर आले आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे चारित्र्य हनन या चित्रपटातून करण्यात आले आहे असा आरोप करत काँग्रेसच्या अतिउत्साही नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी या चित्रपटाला जोरदार विरोध केला होता. विरोध एवढ्या टोकाचा होता की, पुण्यात तसेच नागपुरात दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना पत्रकार परिषद सुद्धा घेता आली नाही. विरोध करत असताना संघ तसेच भाजपच्या सांगण्यावरून हा चित्रपट बनविण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने करण्यात आला.

इंदिराजींचे चारित्र्य हनन होईल असं काहीही या चित्रपटात नाही हे मधुर भांडारकर पाहिल्या दिवसापासून सांगत होते. मात्र ऐकतील ते काँग्रेस नेते कसले. याचा परिणाम असा झाला की चित्रपटाला पत्रकार परिषद घेऊन जेवढी प्रसिध्दी नसती त्यापेक्षा जास्त काँग्रेसने विरोध करून मिळवून दिली.

आज चित्रपट रिलीज झाला तेव्हा काँग्रेस पक्षाने आदेश देऊन कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना हा चित्रपट पाहण्याची सूचना केली होती त्यानुसार आज काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी पहिला शो पाहण्यासाठी गर्दी केली. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे विरोधक देखील हा चित्रपट पाहण्यासाठी कुतूहलाने आले होते. मात्र चित्रपटाची कथा आणि इंदिराजींचे चारित्र्यहनन याचा दूरपर्यंत संबंध नसल्याचे हा चित्रपट पाहिल्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. चित्रपट पाहिल्यानंतर दोन्ही बाजूकडची मंडळी चित्रपटाची कथा, दिगदर्शन, अभिनय याचं कौतुक करताना पहायला मिळाली.

इंदू सरकार मध्ये इंदिराजींबद्दल काहीही आक्षेपार्ह नाही . मधुर भांडारकर यांना विरोध करण्यासाठी नव्हे तर चर्चेसाठी आम्ही गेलो होतो.समाजामध्ये तणाव निर्माण होईल असं काहीही कृती कोणी करू नये – रमेश बागवे(काँग्रेस शहराध्यक्ष ,पुणे)

काहीही असले तरी इंदु सरकार गर्दी खेचण्याचा यशस्वी झाला असून बॉक्स ऑफिस वर चांगली कमाई करतो आहे हे मात्र नक्की