नरेंद्र मोदींच्या बोलण्यात काहीच तथ्य नसते; राहुल गांधी

बोलण्यात काहीच तथ्य नसणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान!

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत कि ज्यांच्या बोलण्यात काहीच तथ्य नसत. असे राहुल यांनी म्हटले आहे. आपण २०१५ सालात नागालँड शांतता करार करून इतिहास घडवला आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मात्र आता २०१९ उजाडल तरी हा करार कुठ अस्तित्वात नाही. असा प्रश्न काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून उपस्थित केला आहे.

राहुल गांधी म्हणाले, मोदी यांनी नेमकी कशावर सही केली, त्यांनी खरोखर एखाद्या करारावर सही केली आहे काय, हे लोकांना समजेनासे झाले आहे. मोदींचा त्या कराराचा निर्णय नोटाबंदी आणि जीएसटीसारखाच होता. त्यांची कार्यपद्धतीच तशी आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सामाजिक कौन्सिक ऑफ नागालँड (एनएससीएन) यांच्यात दहशतवाद संपवण्यासाठी ऑगस्ट २०१५ सालात नागालँड शांती करार झाला होता. गालँडमध्ये येत्या २७ फेब्रुवारीला विज्ञान सभेची निवडणूक होत आहे. राजकीय पक्षांनी राज्यातील बंडखोरांच्या कारवायांच्या प्रश्नावर लवकर तोडगा काढण्यासाठी ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. या संदर्भात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.