खूशखबर : पाच लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कर नाही

blank

टीम महाराष्ट्र देशा- दुसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर मोदी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या आजच्या अर्थसंकल्पाकडे लागून राहिल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली आहे. आजच्या बजेटमध्ये सर्व सामान्यांना काय मिळणार? काय स्वस्त होणार आणि काय महाग? याकडे सर्वांचे डोळे आणि कान लागून राहिले आहेत.

Budget 2019 live updates

– ई कार खरेदी केल्यावर आयकरात दीड लाखांची सूट.

-400 कोटींची उलाढाल असणाऱ्या कंपन्यांना 25 टक्के टॅक्स.

-पाच लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कर नाही.

-थेट करांमध्ये गेल्या दोन वर्षांत वाढ झाली आहे.

-केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे ही वाढ ७८ टक्क्यांपर्यंत झाली आहे.

-गेल्या पाच वर्षात सामान्य माणसांवरचा कराचा बोजा कमी करण्याचं आमचं लक्ष्य आहे.

-गेल्या दोन वर्षांमध्ये थेट करांच्या प्रमाणात ६.३८ लाख कोटी रुपयांवरून ११.३७ लाख कोटी रुपये एवढी झाली आहे.

-कर्ज देणाऱ्या कंपनींवर आता रिझर्व्ह बॅंकेचं नियंत्रण.

-नेत्रहिनांसाठी ओळखण्यासाठी १, २ रुपये, ५ रुपये, १० रुपये आणि २० रुपयांची नवी नाणी आणणार.

-एअर इंडियाच्या विलीनीकरणाची मोठी घोषणा.