EVM- इलेक्ट्रानिक मतदान यंत्रांमध्ये कोणतीही छेडछाड नाही

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पुणे जिल्ह्यातल्या दोन मतदान केंद्रांवर वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रानिक मतदान यंत्रांमध्ये कोणतीही छेडछाड करण्यात आली नव्हती, असा अहवाल हैदराबाद इथल्या न्याय सहायक प्रयोग शाळेनं काल मुंबई उच्च न्यायालयाला दिला. पर्वती मतदार संघातले काँग्रेसचे उमेदवार अभय छाजेड यांनी याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करून मतदान यंत्रांमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला होता. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं या मतदान यंत्रांची न्याय सहायक प्रयोगशाळेत तपासणी करण्याचे आदेश दिले होते.