भाजपकडे हिंदुत्त्वाशिवाय बोलायला ठोस मुद्दाच नाही ; मुख्यमंत्री सिद्धरमय्या

भाजपमध्ये अनावश्यक मुद्द्यांवरून चर्चा

टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारला टार्गेट केले आहे. सिद्धरमय्या यांनी शनिवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल यांची भेट घेतली. सिद्धरमय्या म्हणाले, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी अनावश्यक मुद्द्यांवरून एकसारखीच भाषा बोलत आहेत. त्यांच्याकडे हिंदुत्त्वाशिवाय बोलायला कोणताच ठोस मुद्दा उरला नसल्याने असे होत आहे. याआधी संघ आणि भाजपवाले माणुसकी नसलेले हिंदू अशी टीका सिद्धरमय्या यांनी केली होती.

योगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांच्यावर टीका करत यांच्याकडे बोलायला ठोस मुद्दे नाहीत. त्यामुळे सातत्याने अनावश्यक मुद्दे उकरुन काढले जात आहेत.

कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप मध्ये शाब्दिक चकमक होत आहे. यामध्ये भाजपने कर्नाटकमधील काँग्रेस सरकारविरुद्ध जोरदार मोहीम सुरु केली आहे. मात्र कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेसविरोधात कोणीही नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सहजपणे विजय मिळवेल असा दावा सिद्धरमय्या यांनी केला आहे.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...