ऑलिंंपिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंना स्पॉन्सर नाही, केंद्रीय क्रीडामंत्र्यांची माहिती

मुंबई : भारतात क्रिकेटचे वेड घराघरात पोहोचले आहे. मात्र गेल्या काही वर्षात भारताने इतर खेळातही दैदीप्यमान कामगीरी करत भारतीयांचे लक्ष वेधुन घेतले आहे. क्रिकेट व्यतीरिक्त इतर खेळातही भारताने दैदीप्यमान कामगिरी करत जागतीक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे.

यादरम्यान मागील वर्षी पुर्वनियोजीत ऑलिम्पीक स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या वर्षी आयोजीत करण्यात आली आहे. भारतीय खेळाडू या स्पर्धेच्या दृष्टीने कसुन तयारी करत आहे. या स्पर्धेसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडुंचे पथक हे कोणत्याही पुरस्कर्त्याशिवाय खेळणार आहे. कारण भारतीय पथकाची पुरस्कर्ती असलेली कंपनी लि निंगशी सुरु असलेला करार संपुष्टात आला आहे. क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली.

लि निंग नावाच्या या चिनी कंपनीशी करार केल्यामुळे इंडियन ऑलिंम्पिक असोसीएशनवर टिका झाली होती. यानंतर क्रिडा मंत्रालयाने हा करार स्थगीत करण्यास सांगितले होते. गेल्या आठवड्यात ‘आयओए’ने रिजिजू यांच्या हस्ते भारतीय क्रीडापटूंना ऑलिम्पिक क्रीडा साहित्य सुपूर्द केले होते. हा करार संपुष्टात अल्यानंतर आयओएने नविन पुरस्कर्त्याचा शोध सुरु केला आहे. परंतु भारतीय क्रीडापटूंच्या क्रीडा साहित्यावर पुरस्कर्त्यांचे बोधचिन्ह नसेल, असे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP