मनसे बरोबर आघाडी…? प्रश्नच नाही ! – अशोक चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : देशात भाजप विरोधात लढण्यासाठी सगळे विरोधीपक्ष एकत्र येत आहेत. अशात महाराष्ट्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यातील जवळीक पाहता राज ठाकरे हे विरोधी पक्षाच्या चमूत सहभागी होणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

देशात भाजप सरकारविरोधात सर्व समविचारी पक्ष एकत्र येत आहेत. राज्यातही आमचा तो प्रयत्न आहेच. राज ठाकरे यांच्या मनसेला आमच्या आघाडीत घेण्याचा प्रश्नच नाही. मुंबईत सध्या दुकानातील गुजराती भाषेतील पाट्या तोडण्याचे प्रकार, फेरीवाल्यांना त्यांच्याकडून मिळालेली वागणूक यासह त्यांची अनेक धोरणे आम्हाला अजिबात मान्य नाहीत.

दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही मनसेशी आघाडी करण्याबाबत काही आले नाही. पण, आघाडीत मनसे राहणार नाही हे निश्चित, अस कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केल आहे.

You might also like
Comments
Loading...