fbpx

या राज्यात भाजपचा अद्याप एकही उमेदवार घोषित नाही

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यात एकूण २० राज्यातील १८४ नावांचा समावेश आहे. या यादीत मध्य प्रदेशातील एकाही उमेदवाराचा समावेश करण्यात आला नाही. या यादीत मध्य प्रदेशातील उमेदवारांचा समावेश का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

मध्य प्रदेशातील काही महत्वाच्या जागांपैकी भोपाळ, इंदूर, विदिशा, गुना आणि छिंदवाडा या जागांवर सर्वाचं लक्षलागलेलं आहे. या जागांवरती मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये घमासान सुरू आहे. इंदुरमधून सुमित्रा महाजन यांना उमेदवारी पक्की समजली जाते. छिंदवाडा व गुना या ठिकाणी कॉंग्रेसचं वर्चस्व आहे. याठिकाणी भाजपतर्फे मजबूत उमेदवार देण्यात येईल अशी शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण हेही लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे.