स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही – राष्ट्रवादी 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही – राष्ट्रवादी 

महाविकास आघाडी

मुंबई –  राज्यात आगामी काळात होणाऱ्या निक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपने महाविकास आघाडीला धडा शिकवण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे मात्र महाविकास आघाडीतील  अनेक नेते हे स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः कॉंग्रेस पक्षातील मोठा गट हा स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही. तिथले स्थानिक लोक निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणूका होणार आहेत. तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नाही अशी पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही. कॉंग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी – शिवसेना लढत होणार आहे. ज्याठिकाणी दोन पक्षाची, तीन पक्षाची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल ती परिस्थिती बघून निर्णय होणार आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या