विद्यार्थी आहेत म्हणून हिंसक आंदोलनाचा अधिकार नाही : सरन्यायाधीश शरद बोबडे

टीम महाराष्ट्र देशा : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर देशभरातून त्याला विरोध केला जात आहे. ईशान्य भारतातील आसाम, गुवाहाटी सारख्या ठिकाणी हिंसक आंदोलन झाल्यानंतर आता दिल्लीतही हिंसक आंदोलन सुरु झाले आहे.

त्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनं सुरु असताना नवी दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठातील आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. सुप्रीम कोर्टाने या आंदोलनाची गंभीर दखल घेतली आहे. ”विद्यार्थी आहेत म्हणून हिंसक आंदोलनाचा अधिकार नाही,” असे मत सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांनी व्यक्त केले आहे. तसेच आज हिंसाचार थांबला तरच याप्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल, अशी सक्त ताकीद सुप्रीम कोर्टाने दिली आहे.

Loading...

जामिया मिलिया विद्यापीठाच्या लायब्ररीत बसून पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा निषेध विद्यार्थी करत आहेत. दिल्लीतील विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्येही उमटताना दिसत आहेत. येथील नदवा कॉलेजमध्ये सोमवारी (ता. १६ ) विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलन करत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली आणि आसाममध्ये अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनं झाली आहेत. दिल्लीतल्या जामिया मिलिया विद्यापीठात झालेल्या हिंसक आंदोलनाचे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहोचलं आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्ट उद्या सुनावणी घेणार आहे. त्याचवेळी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार