fbpx

बाटली बंद पाण्याच्या विक्रीवर बंधन नाही

>टीम महाराष्ट्र देशा: बंद पाणी बाटली एमआरपी किमतीत विकण्याची सक्ती कोणत्याही हॉटेल व्यावसायिकाला करू शकत नाही, असा निर्वाळा सर्वोच न्यायालयाने दिला आहे.
सिनेमागृह, हॉटेल, मॉल अशा ठिकाणी बंद पाणी बाटली एमआरपी पेक्षा जास्त किमतीत विक्री केली जाते.  यातून ग्राहकांची आर्थिक पिळवणूक केली जाते. या संदर्भात फेडरेशन आफ हॉटेल अंड रेस्टोरांट असोसिएशन ऑफ इंडिया यांनी याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर सुनावणी देनता सर्वोच न्यायालयाने एमआरपी किमतीत पाणी विकण्याची बंदी करू शकत नाही. बाटली बंद पाणी विक्रीवर कायदेशीर तरतुद लागू होत नाही, त्यामुळे जास्त किमतीत पाणी विक्री करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू शकत नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.