मोदींनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर कधी चहा विकलाच नाही?; आरटीआय मधून धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली : भाजप सत्तेत येण्यापूर्वी व सत्तेत आल्यानंतर मोदींनी चहा विकला आहे का? या एका मुद्यावर सतत राजकारण होतं असल्याचं पाहायला मिळतं आहे. मोदींनी देखील आपल्या बऱ्याच भाषणांमध्ये आपला जन्म एका गरीब कुटूंबात झाला होता. मी माझ्या लहानपाणी उदर्निवाहासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकायचो असा दावा केला आहे. मात्र मोदींनी खरचं चहा विकला का? विकला असेल तर तो कोणत्या रेल्वे स्टेशनवर याबाबतची माहिती अद्यापही उपलब्ध झाली नव्हती.

मात्र आता मोदींनी चहा विकला याचं कोणतंही ऑफिशीयल रेकॉर्ड नसल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे. सामाजिक कार्यकर्ते तहसीन पुनावाला यांनी आरटीआय अंतर्गत ही माहिती भारतीय रेल्वे बोर्डकडे मागितली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या लहानपणी कुठल्याही रेल्वे स्टेशनवर चहा विकल्याचं कुठलंही ऑफिशीयल रेकॉर्ड अथवा नोंद नसल्याचा खुलासा रेल्वे बोर्डकडून करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचं मोदींचं आश्वासन