fbpx

मुंबईवरील नैसर्गिक संकटामध्ये राजकारण नको; आम्हीदेखील सहकार्य करु – अजित पवार

ajit pawar

नागपूर  – गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुंबई शहरात आणि उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामध्ये सरकारी यंत्रणा मदत करताना कमी पडत असून हा मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत आहे. त्यामुळे मुंबईतील अडचणी लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पालकमंत्र्यांना मुंबईकडे रवाना करावे आणि परिस्थितीचा आढावा घेवून लोकांना हवी ती मदत करावी अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पॉंईंट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून सभागृहात केली.

मुंबईत प्रत्येक दिवशी अनेक दुर्घटना घडत आहेत. कधी पाऊस पडतोय तर कधी विमान दुर्घटना घडत आहे. महापालिका कुणाची, सरकार कुणाचं हा वाद नको. सरकार म्हणून उपाययोजना व्हाव्यात. मंत्रालयात काही अधिकारी चांगले काम करतात त्यांना मदतीसाठी घ्या. मनपानेही ताबडतोब पाऊले उचलावी. आम्ही देखील सहकार्य करू. हे नैसर्गिक संकट आहे. यामध्ये राजकारण करायचं नाही असं स्पष्ट मत अजितदादांनी व्यक्त केले.

मुंबई व कोकण भागातील अतिवृष्टीत आवश्यक ती खबरदारी घ्या : देवेंद्र फडणवीस