निवडणुकीत आमच्या समोर राजकीय विरोधकचं नाही : उद्धव ठाकरे

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभा आता अंतिम टप्यात आल्या आहेत. त्यामुळे आज मुंबई येथील बीकेसी मैदानावर महायुतीची संयुक्त सभा पार पडली. या सभेल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेही मंचावर उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईकर नेहमी खरे बोलतात, त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळणार आहे. राज्यात सर्वत्र भगवे वातावरण आहे. या निवडणुकीला आमच्यासमोर राजकीय विरोधक नाही. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ वेगळा होता. स्वातंत्र्यासाठी झपाटलेले लोक होते. मात्र स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला सत्तेची हाव सुटली. मात्र आता कॉंग्रेस पक्ष थकला आहे.

तसेच या महिन्यात दोन विजयादशमी असल्याचे आपण म्हणालो होतो. आता अयोध्येतील राम मंदिराचा निर्णय येईल, तेव्हाही विजयादशमी असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. स्वातत्र्यंवीर सावरकर आणि ज्योतिबांना भारतरत्न देण्याचे भाजपच्या जाहीरनाम्यातील वचन कौतुकास्पद आहे. त्यामुळे आता फुले आणि सावरकरांच्या भारतरत्नाची मागणी लावून धरायला हवी असे, ठाकरे म्हणाले.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा उद्या शांत होणार आहेत. त्यामुळे आता मतपेटीवर मत नोंदवण्याची वेळ आली आहे. २१ तारखेला मतदान होणार असून २४ तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राज्यात जनता कोणाची सत्ता आणणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या