“या अष्टपैलू खेळाडूसाठी मर्यादित संघात कुठेच स्थान नाहीये”, अश्विन बाबत गावसकरांचे मोठे भाष्य

गावसकर

चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ३१७ धावांनी इंग्लंड संघाला पराभूत केले होते. या सामन्याचा हिरो ठरला होता तो भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विन. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटूने अश्विनच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी अश्विनबद्दल वक्तव्य केले आहे. त्यांना नाही वाटत की, अश्विनचे भारताच्या एकदिवसीय आणि टी२० संघात पुनरागमन होईल. अश्विनने भारतीय संघासाठी शेवटचा एकदिवसीय आणि टी२० सामना वेस्ट इंडिजविरुद्ध २०१७ मध्ये खेळला होता. त्यानंतर संघात युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांचे आगमन झाले होते. त्यांनतर अश्विनला मर्यादित षटकांच्या संघात संधी मिळायला बंद झाली.

याबाबतीत गावसकर यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “या अष्टपैलू खेळाडूसाठी मर्यादित संघात कुठेच स्थान नाहीये. याचे कारण असे की, टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांसाठी संघात रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या यांसारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. अशातच मला नाही वाटत की ७ व्या क्रमांकासाठी अश्विनला संघात स्थान असेल. मला नाही वाटत की अश्विन या प्रकारासाठी फिट आहे. पण तो पुढील पाच-सहा वर्षे कसोटी सामन्यात खेळू शकतो.”

महत्वाच्या बातम्या