आमच्या गावामध्ये द्रेशद्रोह्यांसाठी कोणतेही स्थान नाही, गावकऱ्यांनी कन्हैया कुमारला हाकलले

टीम महाराष्ट्र देशा- बिहारमधील बेगुसराय येथून निवडणूक लढवणाऱ्या कन्हैया कुमारला स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. कन्हैया कुमारला आता बेगुसराय मधून विरोध वाढत आहे. रामदीरी गावातील लोकांनी कन्हैया कुमारचा प्रचार रोखला. यावेळी संतापलेल्या गावकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

जेएनयुमध्ये कन्हैया कुमारने देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार कन्हैया कुमार हा बेगूसराय लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. या ठिकाणी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. भाजपाचे गिरिराज सिंह आणि आरजेडीहून तन्वीर हसन या ठिकाणाहून रिंगणात आहेत.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, आतंकवादी अफजल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या कन्हैयाला विरोध वाढत आहे. रामदीरी गावात लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला.या गावातील लोकांनी कन्हैयाची गाडी देखील गावात घुसू दिली नाही.भारतमातेचा जयजयकार करत ग्रामस्थांनी कन्हैयाला गावात प्रवेश करण्यापासून रोखले. संतप्त जमावाने कन्हैयाला नेमकी कशापासून आझादी पाहिजे? असा सवाल करत अक्षरशः हैराण करून सोडले.