मुख्यमंत्र्यांकडून भिडेंना ‘क्लीनचीट’; भिडे गुरुजींविरोधात एकही पुरावा नाही

sambhaji bhide and devendra fadnvis

टीम महाराष्ट्र देशा- आजपर्यंतच्या तपासात संभाजी भिडे यांचा दंगलीत सहभाग असल्याचा एकही पुरावा समोर आलेला नाही असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विधीमंडळात एका प्रश्नांचे उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे. कालच कोरेगाव- भिमा हिंसाचाराचा आरोप असलेल्या संभाजी भिडे यांना अटक करा, या मागणीसाठी काल मुंबईत भारिपकडून एल्गार मोर्चाचं आयोजन केलं होत. या मोर्च्याला मोठ्याप्रमाणावर पाठींबा मिळाला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे गुरुजींविरोधात आतापर्यंत केलेल्या चौकशीत एकही पुरावा मिळालेला नाही. मात्र अजूनही चौकशी सुरु आहे.भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना दंगल करताना मी पहिलं, असं एका महिलेने सांगितलं होतं. त्यानुसार तक्रार दाखली केली. मात्र चौकशीतून अद्याप एकही पुरावा भिडे गुरुजींविरोधात मिळालेला नाही. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल भेट घेतली आणि या प्रकरणी भिडे गुरूजींच्या सहभागाचे पुरावे देतो असं सांगितलं. त्या पुराव्याचंही विश्लेषण केलं जाईल.