वाढत्या इंधन दराच्या समस्येवर राज्य सरकारांनी आपले कर कमी करावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविषयावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आणि इंधनाच्या करांबाबत आवाहन केलं. इंधनावरील कराबाबत केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या सहमतीने निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
राज्याच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. याउलट सीएनजी आणि पीएनजी गॅसवरील करामध्ये राज्याच्या अर्थसंकल्पातून कपात करण्यात आली होती, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- आशिष शेलार यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची टीका; म्हणाले, “ते मोठे नेते आहेत, त्यांच्याशी…”
- “…कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से”, ‘त्या’ निर्णयावरून अमृता फडणवीसांचा सल्ला
- “मग महाराष्ट्रात हे वावटळ…”, योगी सरकारने केलेल्या ‘त्या’ कारवाईवर अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया
- IPL 2022 : दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी उमरान मलिकविषयी केली ‘मोठी’ मागणी!
- IPL 2022 DC vs KKR : ऋषभ पंत विरुद्ध श्रेयस अय्यर; वाचा कोण आहे कोणावर भारी!