‘पंत भविष्यातील भारतीय संघाचा कर्णधार असेल यात कोणतीही शंका नाही’

पंत

मुंबई : आयपीएलच्या १४ व्या मोसमात मोठे मोठे बदल पाहायला मिळाले. या मोसमासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने देखील एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू आणि कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या ऐवजी रिषभ पंतवर संघाच्या कर्णधापदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

या आयपीएलमध्ये पंतने 8 पैकी 6 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून दिला होता. आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित होईपर्यंत दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर होता. आता महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रिषभ पंतबाबत एक मोठे विधान केले आहे. पंत हा हिंदुस्थानी संघाचा भविष्यातील कर्णधार आहे अशी भविष्यवाणी गावस्कर यांनी केली आहे.

आयपीएलमध्ये पंत याने ज्या पद्धतीने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले ते पाहून गावस्कर प्रभावित झाले आहेत. स्पोर्ट्सस्टारमध्ये लिहिलेल्या स्तंभात त्यांनी म्हटलंय की ‘रिषभ पंतच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सचा संघ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ बनला. सहाव्या सामन्यानंतर पंतला कर्णधारपदाबाबत सर्वाधिक प्रश्न विचारले जाऊ लागले. समालोचक कर्णधारपदावरूनच त्याला अधिक प्रश्न विचारत होते. रिषभ पंतमध्ये प्रचंड क्षमता आहे जी त्याला संधी मिळाली तर तो सिद्ध करू शकेल. पंतने चुका जरूर केल्या आहेत, मात्र कोणता कर्णधार चुका करत नाही ?’

सुनील गावस्कर यांनी त्यांच्या लेखात म्हटलंय की पंत भविष्यातील भारतीय संघाचा कर्णधार आहे, आणि यात कोणतीही शंका नाही. कारण त्याने जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा स्वत:मध्ये सुधारणा करत संधीचे सोनं करण्याचा प्रयत्न केला आहे. असं गावस्कर यांनी म्हंटल आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP