राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता ; महादेव जानकर यांच्या उमेदवारीवर अजून निर्णयच नाही

टीम महाराष्ट्र देशा : पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीवर केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार असल्याचं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्यानंतर महादेव जानकर यांच्या उमेदवारीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

अकरा जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. १२ वा अर्ज भाजपचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दाखल केला आहे. त्यामुळे पृथ्वीराज देशमुखांचा अर्ज मागे घेणार की जानकरांचा याबाबत आता राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.

11 विधानपरिषदच्या जागेसाठी महादेव जानकर हे निवडणूक लढवत आहेत. ते आधी भाजपाच्या चिन्हावर परिषदवर निवडणून आले होते. मात्र काल विधानपरिषदचा निवडणुकीसाठी अर्ज भरतांना त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर अर्ज भरला.

56 इंचाच्या छातीपेक्षा, छातीवर मेडल्स असणारी माणसे जास्त महत्वाची – उद्धव ठाकरे

बदल्यांच्या मुद्द्यावरून अधिकारी, केजरीवाल यांच्यात जुंपली; अधिकाऱ्यांचा आदेश पाळण्यास नकार