पाच वर्षांत एकही भ्रष्टाचाराचा डाग आमच्यावर लागलेला नाही : मोदी

टीम महाराष्ट्र देशा- गेल्या पाच वर्षांत एकही भ्रष्टाचाराचा डाग आमच्यावर लागलेला नाही. काळापैसा आणि भ्रष्टाचारावर आम्ही थेट वार केला आहे. देशाचे नामदार प्रत्येकाला शिव्या देत आहेत असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

अकलूज (ता़ माळशिरस) येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.दरम्यान,यावेळी बोलताना मोदी म्हणाले, ”देशात मजबूत सरकार पाहिजे. २०१४ मध्ये तुम्ही पूर्ण बहुमत दिल्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेऊ शकलो. गरिबांसाठी अनेक मोठे निर्णय घेतले. देशाला मजबूत सरकार देणार की कमजोर सरकार देणार हे आता तुम्ही ठरवायचे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची मिलावट भारताला कधीच मजबूत बनवू शकत नाही. माढावाल्यांना मजबूत सरकार हवे आहे. देशाचा चौकीदार सतर्क आहे. आधीच्या सरकारने केवळ बघ्याची भूमिका केली. पण, आम्ही थेट घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले केले.

Loading...

अगोदर फक्त चौकीदाराला शिव्या दिल्या. आता सगळे मोदी चोर आहेत, असे म्हणत आहेत. मागासवर्गीय असल्याने मला सतत शिव्या दिल्या जातात. सगळ्याच मागासवर्गीयांना हे आता शिव्या देत आहेत असा आरोप देखील त्यांनी विरोधकांवर केला.

विजयसिंह मोहिते पाटील भाजपच्या मंचावर, मोदींच्या हस्ते जाहीर सत्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये पार पडलेल्या जाहीर सभा सभेत विजयसिंह मोहिते पाटील यांनी मंचावर उपस्थित लावली आहे, त्यामुळे विजयदादांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोलले जात आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील हे देखील भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती, मात्र विजयदादांनी भाजप प्रवेश न करता भाजपला सहकार्याची भूमिका घेतली होती. अखेर आज त्यांनी अकलूजमध्ये आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टेजवर उपस्थित लावली आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'