जय शहांच्या कंपनीत भ्रष्टाचार नाही; अखेर मुलासाठी अमित शहा मैदानात

आपला मुलगा जय शहा याच्या कंपनीत कोणत्याही प्रकारचा भ्रष्ट्राचार झाल नाही. तसेच त्यांनी कोणतीही सरकारी जमीन किंव्हा कंत्राट घेतलेलं नसून हे भ्रष्टाचाराचं प्रकरण नसल्याच म्हणत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या मुलावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच खंडन केल आहे. तसेच जर काँग्रेसकडे याचे पुरावे असतील तर त्यांनी ते कोर्टात सादर करावेत अस आव्हानही त्यांनी दिल आहे. ‘द वायर’ या वेबसाईटने जय शहा यांच्या कंपनीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात १६ हजार पटींनी टर्नओव्हर वाढल्याच वृत्त दिल होत. त्यानंतर देशभरातून अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी आपल्या मुलाचा बचाव करतानाच कॉंग्रेसवर निशाना साधला आहे. ते म्हणाले कि, स्वातंत्र्यानंतर गेल्या ७० वर्षात काँग्रेसवर अनेक वेळा भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र त्यांनी कधी मानहानीचा खटला दाखल केला का. अथवा त्यांनी किती जणांवर केस केली, उलट आम्ही कोर्टात जाऊन १०० कोटींचा दावा केला आहे. जर कोणाकडे पुरावे असतील तर त्यांनी समोर याव.