‘औरंगाबाद मध्ये कोरोना बाधित रुग्ण नसला तरी जनतेने नियमांचे काटेकोर पालन करावे’

औरंगाबाद : महाराष्ट्रातील कोव्हीड-१९ संसर्ग बाधितांची संख्या २२५ च्या वरती गेली असली तरी देखील सद्य स्तिती अनुसार औरंगाबाद जिल्ह्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याने शहरातील नागरिक निश्चिन्त असल्याचे दिसते आहे. मात्र जिल्ह्यात या संसर्गाचा एकही रुग्ण नसला तरी नागरिकांना बाहेर फिरू नाही अशी विनंती जिन्सी पोलीस स्टेशनचे पीआय व्ही. एम. केंद्रे यांनी केली आहे.

राज्यात संचारबंदी लागू करून ६ दिवस झाले असले तरी नागरिक अजूनही संचाबाडीच्या नियमांचे पालन पूर्ण पणे करतांना दिसून येत नाही. बाहेर काय चाललेय हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने खोटे कारण बनवून बाहेर निघणाऱ्यांची संख्या अजूनही मोठ्या प्रमाणात शहरात असल्याने धोका पूर्ण पणे टळला नसल्याचे आपल्याला लक्षात घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे केंद्रे यांनी सांगितले. जो पर्यंत या आजाराला आपण राज्यासह संपूर्ण देशातून हाकलून लावत नाही तो पर्यंत संपूर्ण जनतेने आरोग्य व्यवस्था, पोलीस सुरक्षा यंत्रणा तसेच शासनाला सहकार्य करावे अशी विनंती देखील त्यांनी केली.

तत्पूर्वी देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने हजाराचा आकडा घातल्या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "आपण थर्ड स्टेज मध्ये प्रवेश करतो आहोत, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी राज्यातील नागरिकांनी संचारबंदीच्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे" असे सांगितले होते.