भाजप नेत्यांमध्येचं एकमत नाही, ‘या’ नेत्याने सत्य आणले समोर

blank

टीम महाराष्ट्र देशा : भाजप सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला होता. मंगळवारी माध्यमांशी बोलताना राणे यांनी हे सूचक विधान केले होते. या विधानानंतर सत्ता स्थापनेच्या शर्यतीत भाजपची होणार ‘री – एन्ट्री’ करणार का ? या चर्चेला उधान आले होते. मात्र या चर्चेला वेळीच पूर्णविराम देण्याचे काम भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.

सत्ता स्थापनेच्या प्रयत्नाबाबत भाजपच्या कोर कमिटीच्या मिटिंगमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे राणे यांनी केले विधान हे व्यक्तिगत असू शकते, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तर राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी सर्वांनाच कल्पना आहे. मुख्यमंत्र्यांनी सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे भाजप सत्तास्थापनेसाठी प्रयत्न नक्कीच करणार आहे. लवकरच भाजपचं सरकार स्थापन होईल, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते.

नारायण राणे यांचे हे व्यक्तिगत मत आहे, असे सांगत सुधीर मुनगंटीवार यांनी असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहे. आज राज्यात राष्ट्रपती शासन लागू झालं. काही राजकीय पक्षांनी जनादेशाचा आदर केला. शेतकरी संकटात आहे. अनेक समस्या आहेत. असं असताना जनादेशाच्या अनादर करण्यात आला. त्यामुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाली.

महत्वाच्या बातम्या