कॉंग्रेस पक्ष सोडण्याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही, सुजय विखे- पाटलांच्या कोलांट उड्या

टीम महाराष्ट्र देशा : ‘माझे आईवडील काँग्रेसमध्ये आहेत म्हणून मी देखील त्याच पक्षात राहावं अस काही नाही, शेवटी मला जे नेतृत्व मान्य असेल तिकडे मी जाईलच भले त्याला माझ्या घरच्यांचा विरोध असेल तरी मी माझा निर्णय घेईल’ असं वक्तव्य करून खळबळ उडवून देणाऱ्या डॉ. सुजय विखे-पाटील यांनीआता यु-टर्न घेतला आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत, पण जागा वाटपात काँग्रेसला ही जागा मिळाली नाही तर, वेगळा राजकीय निर्णय घेण्याचा सुतोवाच करताना, मी अन्य पक्षात जाण्याबाबत आणि कॉंग्रेस पक्ष सोडण्याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. माझ्या वक्तव्याचा केवळ सोयीने अर्थ काढला गेला असल्याचा खुलासा डॉ. सुजय विखे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

Loading...

शिबलापूर येथे निळवंडे कालव्यांच्या मागणीसाठी शेतकऱ्यांंच्या आंदोलनानंतर माध्यमांशी संवाद साधताना हा यु-टर्न घेतला आहे. माझ्या वक्तव्याचा पत्रकारांनी वेगवेगळ्या अर्थाने अंदाज लावला अशी सारवासारव करत माध्यमांवर त्यांनी खापर फोडलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी